काळवीट शिकार प्रकरणी सलमानने मागितली कोर्टाची माफी

जोधपूर – काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खानला काही दिवसांपूर्वी समन्स बजावला असून त्याला  1 डिसेंबरला  कोर्टात प्रत्यक्षात उपस्थित राहण्यास सांगितले होते. सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. मात्र, सलमान  कोर्टात हजर राहू शकणार नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. यातच बॉलीवूड मॅगझिनच्या माहितीनुसार, सलमान खाननं काळवीट शिकार केसमध्ये खोटं शपथपत्र जमा केल्याबद्दल माफी मागितली आहे. 

नेमकं प्रकरण काय

 ८ ऑगस्ट २००३ रोजी सलमाननं चुकून ते शपथपत्र दिलं होतं. कारण बीझी शेड्यूलमुळे सलमान हे विसरून गेला होता की त्याचा शस्त्र परवाना रि-न्यू करण्यासाठी देण्यात आला आहे. ज्यामुळे त्याने न्यायालयाला त्याचा शस्त्र परवाना हरवल्याचं शपथपत्र दिलं होतं.  सलमाननं २००३ मध्ये जोधपूर सत्र न्यायालयात एक शपथपत्र जमा केलं होतं. जे नंतर खोटं असल्याचं समोर आलं होतं.   काळवीट शिकार केसमध्ये खोटं शपथपत्र जमा केल्याबद्दल त्याने  माफी मागितली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.