सलमान-कतरिना पुन्हा येणार एकत्र ?

सध्या हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये सलमान आणि कतरिना पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला उधान येत आहे. त्यांचे नाते पुन्हा नवीन वळण घेणार की नाही हा दुसरा मुद्दा असला तरी ते सध्या अली अब्बास झफर यांच्या ‘भारत’ या चित्रपटातसाठी एकत्र येऊ शकतात. हा चित्रपट प्रियांका चोप्राहिच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये परतीचा चित्रपट होणार होता. परंतु, तिच्या काही ‘स्पेशल -स्पेशल’ कारणामुळे तिला हा जमणार नसून आता अली अब्बास झफर दुसर्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत.
अली अब्बास झफर यांनी शुक्रवारी ट्विट करून सांगितले होते की काही स्पेशल कारणांनी प्रियांका या चित्रपटातून बाहेर पडली आहे. प्रियांका या चित्रपटातून बाहेर पडल्याने त्यांना मोठा धक्का देखील बसला होता. परंतु यामुळे प्रियांकाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील पुनरागमन लांबणीवर पडणार आहे.
चित्रपटाचे निर्मीते अतुल आणि अल्वीरा अग्निहोत्री यांच्यासोबत कतरिनाचे खूप चांगले संबंध आहेत त्यामुळे असे बोलले जात आहे की ‘ भारत ‘ या चित्रपटात सलमान आणि कतरिना  पुन्हा एकत्र येऊ शकतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)