सलील कुलकर्णीच्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचं पोस्टर लॉंच

मुंबई -मराठी चित्रपटसृष्टी मधील प्रख्यात संगीतकार ‘सलील कुलकर्णी’ लवकरच सिनेरसिकांसाठी एक सुंदर विषय घेऊन येत आहे. नुकतंच सलील यांनी चित्रपटाची घोषणा करत चित्रपटाचं पहिलं-वहिलं पोस्टर सोशल मीडियावरुन लॉंच केलं आहे. सलील कुलकर्णी ‘एकदा काय झालं’ चित्रपटात लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार या विविधांगी भूमिकेत रसिकांसमोर येणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वी देखील सलील कुलकर्णी रसिकांसाठी ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आला होता. पारंपारिक रीतीरिवाजांपासून आधुनिक फॅशन-तऱ्हा आणि पद्धती यांचा मिलाफ आणि त्यातून भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणारा चित्रपट म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’चे जोरदार कौतुक झाले. त्यामुळे वेडिंगचा शिनेमानंतर ‘एकदा काय झालं’बद्दलही रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.