कमी खर्चाच्या घरांची विक्री वाढली – सर्वेक्षण

नवी दिल्ली – लॉक डाऊनमुळे एप्रिल ते जून 2020 या काळात घर निर्मिती आणि विक्रीवर परिणाम झाला होता. मात्र आता हे क्षेत्र पुनरुज्जीवित होत आहे. त्यातल्या त्यात कमी खर्चाच्या घरांची विक्री वाढू लागली आहे, असा दावा 2020-21 च्या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात नॅशनल हौसिंग बॅंक व रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीचा हवाला देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 109 लाख घरांना परवानगी देण्यात आली आहे. यातील 70 लाख घरांची निर्मिती चालू झाली आहे. केंद्र सरकारने आणि विविध राज्य सरकारनी घर निर्मिती आणि विक्रीला चालना मिळावी याकरिता बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर या क्षेत्रातील पारदर्शकता जीएसटी आणि रेरा कायद्यामुळे वाढली आहे असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.