जास्त करांमुळे हायब्रीड वाहनांची विक्री कमी

नवी दिल्ली – सध्या हायब्रीड वाहनांवर एकूण कर 43 टक्‍के आहे. ग्राहकांना हे वाहन फारच महागात पडत आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या वाहनावरील कर कमी करण्याच्या शक्‍यतेवर सरकारने गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने म्हटले आहे.

चीनसारखे देश या क्षेत्रात आगेकूच करीत आहेत. भारतामध्ये हे तंत्रज्ञान विकसित होण्यास जास्त कराचा अडथळा ठरत आहे, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाजू योशिमुरा यांनी सांगितले. ते म्हणाले की, टोयोटा कंपनीने गेल्यावर्षी हायब्रीड कार सादर केली आहे. या कारची किंमत 37 लाख 50 हजार रुपये एवढी भरते. त्या तुलनेत या क्षमतेची इतर वाहने कमी किमतीत मिळतात. साहजिक ग्राहक अशा कार वापरत नाहीत. त्यासाठी कराचे दर कमी होण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.