अमान – भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू साक्षी चौधरी हिने 57 किलो वजनीगटात आशियाई ऑलिंपिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या मानांकित निलवन तेकस्युपचा पराभव केला.
19 वर्षांच्या साक्षीने आशियाई ब्रॉंझविजेत्या तेकस्युपवर विजय मिळविताना आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे सिद्ध केले.
तिची आता उपांत्य फेरीत कोरियाच्या इम ऐजी हिच्याशी येत्या सोमवारी लढत होईल. साक्षीला येत्या जुलै महिन्यात होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचा विश्वास आहे.
गुरुवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या फेरीमध्ये साक्षीने वर्चस्व राखले. दुसऱ्या फेरीत देखील साक्षीने तेकस्युपला संधीच दिली नाही व अखेर हा सामना 3-2 अशा फरकाने जिंकला.