साक्षी महाराजांनी घेतली बलात्कारी आमदाराची भेट 

सीतापूर –  उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी बुधवारी  सीतापूरला  येथे  सामूहिक बलात्कार आणि हत्येतील आरोपी बांगरमऊचा आमदार कुलदीप सिंह सेंगरची जिल्हा कारागृहात जाऊन भेट घेतली. यावेळी कुलदीप सिंह यांना साक्षी महाराजांनी यशस्वी आणि लोकप्रिय असल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचे आभार मानने योग्य वाटले म्हणून तुरुंगात भेटायला आलो, असे त्यांनी सांगितले. या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. मात्र या भेटीमुळे विरोधी पक्ष यांनी भाजप पक्षांवर टीकेचे सत्र सुरु केले आहे.

दरम्यान, भाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. जून, 2017 मध्ये ए भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित युवतीने केला होता. या प्रकरणात वातावरण संतप्त बनल्याने 13 एप्रिल 2018 मध्ये आमदाराला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.