रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा “बिग बॉस-14″मध्ये एन्ट्री करणार असल्याचे वृत्ताने प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. हे वृत्त सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे. “बिग बॉस”च्या या सीजनमध्ये साक्षी निश्चित सर्व वोटिंगमध्ये सुरक्षित राहणार असल्याचे समजते.
“बिग बॉस-14″मध्ये साक्षी चोप्रा झळकणार असल्याचे वृत्त समोर आल्यापासून चाहत्यांमधील उत्साह वाढला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून अनेक रिऍक्शन येत आहेत. अन्य कलाकारांपेक्षा साक्षीच्या चाहत्यांनी तिच्यावर अनेक पटीने कमेंट् केल्या आहेत. एका चाहत्याने बिग बॉसच्या टीमला ट्विट केले की, मी आपणास सर्वाधिक टीआरपी देईन.
कृपया आपण साक्षीला शोमध्ये घ्यावे आणि ती अखेरपर्यत राहील हे सुनिश्चित करावे. याशिवाय हजारो जणांनी कमेंट्स केल्या आहेत. यावरून साक्षीचे किती चाहते आहे हे स्पष्ट होते आणि जेव्हा ती बिग बॉसच्या घरात प्रवेश करेल तेव्हा तर बोलायचे कामच नाही?
दरम्यान, करोनामुळे लांबणीवर पडलेला “बिग बॉस 14” हा शो कशा असेल याबाबतही खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या शोचे शूटिंग कसे होणार याबाबतही जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्साहित आहेत.