मुंबई – मुंबईतील निर्भयाची मृत्यूशी झूंज अखेर अपयशी ठरली आहे. साकीनाका परिसरात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र पुन्हा हादरला; अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या
या घटनेनंतर राज्य तसेच देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असल्याचे सांगितले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरण : घडलेली घटना मन सुन्न करणारी, या नराधामांना फाशीच द्या : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेत तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. या प्रकरणी तपासाला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Sakinaka Rape Case : ‘ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख’; चित्रा वाघ यांची भावनिक प्रतिक्रिया
या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगतले आहे.