साकळाईचे श्रेय भाजपलाच : खा. विखे

कुठल्याही व्यक्तीचा अपमान केला नसल्याचे दिले स्पष्टीकरण

नगर  – नगर-दक्षिण लोकसभा मतदार संघातून नागरिकांनी मला खासदार म्हणून निवडून दिले आहे. त्यांच्या मूलभूत प्रश्‍न सोडवणे हे माझे काम आहे. आपल्या पाठपुराव्या मुळे योजनेच्या सर्वेक्षणामुळे निधी मिळाला आहे. त्यामुळे हा प्रश्‍न भाजपच मार्गी लावणार आहे. त्यामुळे कुणीही त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असे, खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी रविवार (दि.15) रोजी पत्रकार परिषद घेऊन खा. डॉ. विखे यांनी नगर तालुक्‍यातील गुंडेगाव येथील सभेत अपशब्द वापरले असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर वक्तव्य करत विखे म्हणाले की, मी देखणा माणूस म्हटलो की कोणत्या व्यक्तीचे नाव घेतले नाही. देखणा माणूस हे अपशब्द नाही. या शब्दामुळे एखाद्याच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माझे शब्द मागे घेतो.

साकळाई योजना ही मुळातच भाजप सरकार आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी साकळाई पाणी योजनेचा सर्वेचा आदेश काढला. हे अधिकृत भाष्य हे भाजपचे पदाधिकारी व जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच करू शकतात. उद्या कुणी आंदोलनात सहभागी होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र, साकळाईसाठी निधी सुजय विखेच आणू शकतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडूण येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)