ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने अभिनेत्री सय्यामी खेरचा “लीक ऑडिशन टेप’ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुराग कश्यपच्या नेटफ्लिक्स चित्रपट “चोक्ड : पैसा बोलता है’मध्ये काम करण्यापूर्वी “सेक्रेड गेम्स, मनी हाइस्ट आणि स्ट्रेन्जर थिंग्ज’साठी सैयामी खेरचा ऑडिशन अयशस्वी ठरल्याचे दाखविण्यात आले आहे. एखाद्या चित्रपटाचे ऑडिशन देताना कोणता अभिनेता अयशस्वी झाला हे लोकांना क्वचितच माहिती होते. पण सैयामीचा हा व्हिडिओ समोर आला आहे.
“चोक्ड : पैसा बोलता है’ हा चित्रपट 5 जूनला प्रदर्शित करण्यात आला आहे. “मिर्जया’ चित्रपटाने बॉलीवूड कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सैयामी खेरसह रोशन मॅथ्यूने “चोक्ड’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सैयामीने एका बॅंक कर्मचा-याची भूमिका साकारली आहे. याची कथा निमित भावेने लिहिली आहे.
दरम्यान, हा चित्रपट अनुराग कश्यपने आपली गलफ्रेंड शुभ्रा शेट्टीला समर्पित केला आहे. तो म्हणाला की, खरं तर शुभ्रानेच “चोक्ड’ चित्रपटाची कथा आपल्यापर्यंत आणली होती. त्यामुळे तिचे आभार मानण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचेही अनुरागने सांगितले.