मुंबई – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आर्चीची भूमिका वठवून रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिंकू लवकरच ‘हंड्रेड’ नावाच्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. यात अनेक नामवंत कलाकारांसह ती स्क्रीन शेअर करत आहे. विशेष म्हणजे यात बॉलिवूड अभिनेत्री ‘लारा दत्ता’सह तिची मुख्य भूमिका असणार आहे. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्लाच्या भूमिकेत झळकणार आहे.
नुकतंच ‘हंड्रेड’ या वेबसिरीजचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित झाला असून,अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर हा ट्रेलर सुपरहिट ठरला आहे.