मुंबई – ज्येष्ठ अभिनेते आणि ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांनी आज वयाच्या ९८ व्या वर्षी जगाला निरोप दिला आहे. गेल्या काही दिवसापासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होेते. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अखेरचा निरोप देताना सायरा यांनी दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे चुंबन घेतले. हे दृक्ष बघून उपस्थितींना अश्रू अनावर झाले.
दिलीप कुमार यांच्या जाण्याने सायरा स्तब्ध झाल्या होत्या. शेवटचा निरोप देताना सायरा यांनी दिलीप कुमार यांना मिठी मारली व त्यांच्या पार्थिवाचे चुंबन घेतले. यावेळी सायरा यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या लाटा वाहू लागल्या. त्यांचे हे अश्रू कोणीही रोखू शकले नाही.
दिलीप कुमार यांना संध्याकाळी ५च्या सुमारास मुंबईतील जुहू येथील कब्रिस्तानमध्ये सुपुर्द-ए-खाक करण्यात आले. दिलीप कुमार यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पाणावलेल्या डोळ्यांनी सायरा बानो यांनी अखेरचा निरोप दिला.
गेल्या ५६ वर्षांपासून सायरा बानो दिलीप कुमार यांची काळजी घेत होत्या. दिलीप कुमार यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहिल्या. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी सायरा बानो यांना कळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. “अल्लाहने माझ्या जगण्याचा आधार हिरावून घेतला. साहेबांशिवाय मी कोणत्याच गोष्टीचा विचार करू शकत नाही. सगळ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करा”
सायरा बानो यांनी 1966मध्ये वयाच्या 22व्या वर्षी दिलीप कुमार यांच्याशी लग्न केलं होतं. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी दिलीप कुमार 44 वर्षांचे होते.