लष्कराचे दक्षिण विभागप्रमुख लेफ्टनंट जनरल एसके सैनी यांची माहिती
पुणे : दक्षिण भारत आणि भारतीय द्विपकल्पात दहशतवादी हल्ला होण्याची भीती लष्कराचे दक्षिण विभागप्रमुख लेफ्टनंट जनरल एसके सैनी यांनी व्यक्त केली.
येथून जवळ असणाऱ्या कान्हे येथे लष्करी विधी महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभानंतर श्री. सैनी पत्रकारांशी बोलत होते. दक्षिण भारत आणि भारतीय द्वीपकल्पात दहशतवादी हल्ल्याची शक्यता असणाऱ्या अनेक माहिती हाती आल्या आहेत.भारत पकिस्तान दरम्यान सर क्रिक भागात काही संशयास्पद बोटी जप्त केल्या आहेत.
370 कलम रद्द केल्यानंतर देशातील फुटीरतावाद्यांपेक्षा परकीय शक्तींचा उपद्रव वाढला. जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास लष्कर सज्ज आहे, असे त्यांनी एका प्रश्नाल उत्तर देताना सांगितले.