#Video : वारीत गाडगेबाबांच्या वेशात स्वच्छतेचा संदेश देणारा ‘हा’ अवलिया तुम्ही पाहिलात का ?

पुणे – समाजाला स्वच्छतेचा धडा देत कीर्तनातून समाजपरिवर्तन करणारे संत गाडगेबाबा सगळ्यांनाच परिचित आहेत. संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांच्या विचाराने प्रेरित होईन सोलापूर येथील शेतकरी फूलचंद नागटिळक (वय 50 वर्षे) गाडगेबांबाचा वेश परिधान पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देत आहेत.

मागील पाच वर्षापासून संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्यात ते सहभागी होऊन स्वच्छतेबरोबरच युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत. संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यत पोहचावा, यासाठी गाडगेबाबांची वेशभूषा करून ते पंढरीच्या वारीत सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.