नगर (प्रतिनिधी) – संत सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वरसेवा अशी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांची लौकिक आहे, असे प्रतिपादन श्री संत सावताश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले.
श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री सावता श्रम शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सचिव प्रा.सुनिल जाधव, कार्याध्यक्ष विष्णू फुलसौंदर, जालिंदर बोरुडे, गोरख बोरुडे, शेखर व्यवहारे, मुख्याध्यापक संजय चौरे, मुख्याध्यापिका सुनिता पालवे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी चौरे यांनी संत सावता महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. प्रा.सुनिल जाधव यांनी आभार मानले.