हैद्राबाद – हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा आज हैद्राबाद पोलिसांनी इन्काउंटर केला. या घटनेनंतर देशभरातून हैद्राबाद पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रकरणावर राजकीय नेते, कलाकार यांच्याबरोबरच खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ट्विट केले आहे.
Great work #hyderabadpolice ..we salute u ?
— Saina Nehwal (@NSaina) December 6, 2019
सायनाने ट्विट करताना म्हटले आहे की, ग्रेट वर्क हैद्राबाद पोलीस, आम्ही तुम्हाला सलाम करतो, अशा शब्दांमध्ये तिने हैद्राबाद पोलिसांचे कौतुक केले आहे. दरम्यान , तेलंगणाच्या राजधानीजवळील शादनगर गावात 7 नोव्हेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता. अज्ञात लोकांनी पशुवैद्यकिय महिला डॉक्टरवर बलात्कार करूनपीडितेला जिवंत जाळले होते.
या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती. मात्र आज या आरोपींना घटनास्थळावर नेण्यात आले, तेव्हा आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला. तेलंगणा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे देशातून पोलिसांचे आणि तेलंगणा सरकारचे कौतूक केले जात आहे.