मुंबई : बॅडमिंटन कोर्टवरून भारतीय जनता पक्षाच्या तंबूत दाखल झालेली सायना नेहवाल एका मासिकाच्या कव्हरसाठी केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. वोग या प्रसिध्द मासिकासाठी सायनाने प्रथमच धाडसी फोटोशूट केले. मात्र नेटक-यांनी तिला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही.
🙎♀️ 💃💃 @VOGUEIndia pic.twitter.com/pcybCxWJFo
— Saina Nehwal (@NSaina) February 6, 2020
माॅडलिंगमध्ये रस घेण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित केले तर अनेक स्पर्धा जिंकशील अशा शेलक्या शब्दांत तिच्यावर टीका करण्यात आली आहे.
Breaking records and creating history, our #February2020 cover star @NSaina has game! pic.twitter.com/i2vZjxsAbt
— VOGUE India (@VOGUEIndia) February 4, 2020
वोग मासिकाने वोग इंडिया या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सायनाचे काही फोटो प्रसिध्द केले होते.
❤️❤️❤️❤️@VOGUEIndia cover pic.twitter.com/LwZiEwoIHt
— Saina Nehwal (@NSaina) February 4, 2020
केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचे जाहीर समर्थन करणारी सायना भाजपमध्ये दाखल झाली तेव्हा देखील तिला ट्रोल करण्यात आले होते.
वोग इंडियाच्या या महिन्याच्या अंकाच्या कव्हर पेजवर सायना झळकली आहे. सायनाने यापूर्वी देखील फेमिना इंडिया या मासिकासाठी फोटोशूट केले होते.