बँकाक : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच बाद झाली. डेन्मार्कच्या लिने होजमार्क केर्ज्सफेल्डने सलग दुस-या सलामीच्या लढतीत तिचा पराभव केला.
Saina Nehwal among four Indian shuttlers to make first-round exit from Thailand Masters. #BWF #SainaNehwal
— Press Trust of India (@PTI_News) January 22, 2020
महिला एकेरीत डेन्मार्कच्या लिने होजमार्क केर्ज्सफेल्डने पाचव्या मानांकित सायना नेहवालचा २१-१३, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. या पराभवानंतर स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
या मोसमातील पहिल्या मलेशिया मास्टर्समध्ये सायनाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता, तर इंडोनेशिया मास्टर्समधून ती पहिल्याच फेरीतून बाहेर पडली होती.