पॅरिस – फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले आहे. शुक्रवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कोरियाच्या अॅन से यंगला तिने तोडीस तोड लढत दिली. मात्र, तिच्यासमोर सायनाचा निभाव लागू शकला नाही.
दरम्यान, पहिल्या सेटमध्ये यंगने ७-२ अशी आघाडी घेतली. परंतु सायनाने ही दरी ७-८ अशी कमी करून मग १५-१२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर यंगने सातत्यपूर्ण खेळाच्या बळावर सायनाला १८-१५ असे मागे टाकले. तिने २०-१९ अशी मजल मारताना ‘गेम पॉइंट’सुद्धा मिळवला. परंतु तीन सलग गुणांसह सायनाने पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये यंगने पुन्हा झोकात सुरुवात करीत ५-२ अशी आघाडी घेतली. मग यंगने १६-११ अशा आघाडीसह विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले, परंतु अनुभवी सायनाने १८-१८ अशी बरोबरी साधली. सायनाने मग तीन गुणांसह २१-२० अशी मजल मारली. परंतु यंगने पुन्हा सलग तीन गुणांसह सामना जिंकला. हा सामना यंगने २२-२०, २३-२१ अशा फरकाने जिंकला.