पुणे – बाहुबली फेम प्रभास आणि सैफ अली खानच्या “आदिपुरुष’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. “आदिपुरुष’ मधील मोशन कॅप्चर प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली, असे दिग्दर्शक ओम राऊत यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.
ओम राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये “आदिपुरुष’ सिनेमाची सर्व टीम एका फोटोमध्ये दाखवली आहे. या सिनेमात सैफ अली खान, प्रभास आणि कृती सेनन हे लीड रोलमध्ये असतील.
ओम राऊत यांनी “तानाजी’सारखा हिट सिनेमा डायरेक्ट केला आहे. “आदिपुरुष’ मध्ये अतिशय उच्च दर्जाचे व्हिज्युअल इफेक्टस वापरलेले असणार आहेत. मोशन कॅप्चरनंतर ऍक्टरच्या ऍक्शनला डिजिटली रेकॉर्ड केले जाणार आहे.
त्यामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स मिसळले जाणार आहेत. हा एक भन्नाट अनुभव असणार आहे. अशी टेक्नॉलॉजी आतापर्यंत केवळ हॉलीवूडच्या ऍक्शनपटांमध्येच वापरण्यात आली होती.
प्रभासच्या बाहुबलीमध्ये असेच भन्नाट इफेक्ट्स वापरले गेले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता “आदिपुरुष’ मध्ये बघायला मिळेल. प्रभासच्या “सलार’ या दक्षिणेकडचा आणखी एक सिनेमा नुकताच हैदराबादेत रिलीज करण्यात आला. प्रभासचे आणखी दोन सिनेमे प्रॉडक्शनच्या प्रोसेसमध्ये आहेत.