मुंबई : सैफ अली खान आणि तब्बू यांचे लीड रोल असलेला “जवानी जानेमन’ एक आठवडाभर आगोदरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 7 फेब्रुवारीला रिलीज करायचे नियोजन निर्मात्यांनी केले होते.
आता हा सिनेमा 31 जानेवारीला रिलीज होनार आहे. नितीन कक्कर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच सिनेमा असणार आहे. याशिवाय पूजा बेदीची कन्या अलाइया फर्निचरवाला ही देखील या सिनेमातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.
सैफ आणि अलाइया हे दोघेजण सिनेमामध्ये बाप-लेकीच्या रोलमध्ये दिसणार आहेत. तब्बूचा रोल विशेष महत्वाचा असणार आहे. सैफ अली खानच्याच “ब्लॅक नाईट फिल्म्स’द्वारे “जवानी जानेमन’ची निर्मिती केली गेली आहे.
जय शेवाक्रामानीच्या नॉर्दन लाईटस फिल्म्स ऍन्ड जॅकी भगनानीच्या पूजा एन्टरटेनमेंटचीही या सिनेमाला सहनिर्मिती लाभलेली आहे. तब्बू आणि सैफ हे बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसणार आहेत. तब्बूने रोमॅंटिक रोल करणे सोडून दिले असले, तरी तिच्या वाट्याला आलेला हा रोल तशाच धाटणीचा असावा.