भाजपची नाराजी
सैफ अली खानच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. सैफ अली खान एक चांगला अभिनेता आहे. तो इतिहासाचे अपूर्ण ज्ञान घेऊन बोलत आहे. भारताचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. याची माहिती त्याला नसावी.
त्याने राम राज्यापासून भारतीय इतिहासाची सुरुवात केली, तर त्यांच्या लक्षात येईल की जग भारताला का मानत आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य करून सैफ अली खानने भारतीय इतिहासाखाली दाखवत इंग्रजांना मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे दुर्दैवी आहे, असे राम कदम यांनी म्हटले.