मुंबई – अभिनेता सैफ अली खान सोशल मीडियावर सक्रिय नाही. पत्नीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री करीना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. एकेकाळी सैफ सोशल मीडियावरही होता आणि तो फेक अकाउंटचा वापरही करायचा. याचा खुलासा खुद्द सैफ अली खानने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान सैफने हा किस्सा सांगितला आहे. सैफ म्हणतो- काही वर्षांपूर्वीपर्यंत मी सोशल मीडियावर सक्रिय होतो. मग मी माझे नाव शकुन कोठारी ठेवले. सैफ अली खानच्या एका चित्रपटात शकुन कोठारी हे त्याचे नाव होते. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याने शकुन कोठारी नावाने बनावट खाते तयार केले होते.
सैफ अली खानला ट्रोलिंग अजिबात सहन होत नाही. यामुळेच तो सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत करतो. तो म्हणतो- मी सध्या सोशल मीडियावर नाही पण मला त्याबद्दल सर्व माहिती आहे. तो म्हणतो की मला फालतू कमेंट्स अजिबात आवडत नाहीत.
सैफ अली खानची पत्नी करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याचा खुलासा सैफ अली खानने अनेकदा केला आहे. त्याच्या मते करीना मिस इंस्टाग्राम आहे.