मुंबई – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विक्रम वेधा या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान ह्रितिक रोशनसोबत दिसला होता. त्यासोबतच सैफ प्रभाससोबत आदिपुरुषमध्ये देखील दिसणार आहे. आदिपुरुषमध्ये स्पाईक्स हेअरस्टाईल लूकमध्ये असलेल्या रावणरूपी सैफच्या पात्राची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच सैफने आपल्या आगामी ड्रीम रोलबाबत भाष्य केलं आहे.
आदिपुरुषमध्ये सैफने साकारलेल्या लँकेशा रुपी रावणाची चांगलीच चर्चा सुरु आहे. अशात सैफने आपल्याला महाभारतात देखील काम करायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यासाठी त्याने एक अट देखील घातली आहे. तो म्हणतो,जर कोणी महाभारत लॉर्ड ऑफ द रिंग्ज प्रमाणे बनवणार असेल तर काम करायला नक्की आवडेल. एका न्यूज पोर्टलशी बोलताना सैफ अली खानने हा खुलासा केला आहे.
जेव्हा सैफला त्याच्या ड्रीम रोलबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘मी फक्त मला काय ऑफर केले आहे याचा विचार करतो. खरे सांगायचे तर माझी कोणतीही ड्रीम भूमिका नाही.कारण असा विचार करण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. तरीही, मला महाभारतात अभिनय करायला आवडेल, जर कोणी ते ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारखे बनवले तर असं स्पष्ट मत सैफने यावेळी व्यक्त केले.