Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस संशयिताची चौकशी करण्याची तयारी करत आहेत.
सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वांद्रे पोलीस ठाण्यात एका आरोपीला आणण्यात आलं आहे. पोलिसांनी या आरोपीविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसलेला आरोपी आणि पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयिताची शरीरयष्टीसारखीच दिसत असल्यामुळे हल्लेखोराला पकडल्याचं बोललं जात आहे. मात्र, पोलिसांनी सध्या यावर भाष्य करण टाळले. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
जोवर तोच हल्लेखोर आहे हे स्पष्ट होत नाही तोवर काही माहिती जाहीर केली जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांची 20 पथकं तयार करण्यात आली आहे.
दरम्यान, या हल्ल्यात सैफ गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर दोन शस्रक्रीया करण्यात आल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर धारधार शस्त्राने सहा वार केले आहेत. सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी शस्त्रक्रीया करुन बाहेर काढला असून त्याच्या मानेवर आणि डाव्या हातावर झालेल्या जखमांवरील उपचाराचा भाग म्हणून प्लॅस्टीक सर्जरीही करण्यात आली आहे.
मात्र सैफवर सध्या सुरु असलेल्या उपचारांचा खर्च किती आला आहे याची माहितीही समोर आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली असून, यामध्ये एकूण इलाजाचा खर्च सांगण्यात आला आहे.
मिळालेल्या बातमी नुसार, 16 जानेवारी रोजी सैफवरील उपचारांसाठी करण्यात आलेला कॅशलेस उपचारांचा अर्ज मान्य करण्यात आला आहे. सैफ पाच दिवस रुग्णालयात असेल असंही या अर्जातून स्पष्ट झालं आहे. म्हणजेच सैफला 21 तारखेला डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. सै
फच्या एकूण इलाजाचा खर्च 35 लाख 98 हजार रुपये इतका झाला आहे. त्यापैकी 25 लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. सैफला गुरुवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर 5 तास शस्रक्रीया सुरु होती. सध्या सैफची प्रकृती स्थीर असून त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.