Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. आरोपीने अभिनेत्यावर सहा वेळा हल्ला केला होता. तेव्हापासून सैफ मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर मागील पाच दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
सैफ अली खानची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर आणि मुलगी सारा अली खान त्याला रुग्णालयातून घरी आणण्यासाठी आल्या होत्या. सैफ सहा दिवसांनंतर त्याच्या घरी परतला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्याला फक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या घटनेनंतर सैफ अली खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. Saif Ali Khan |
Actor Saif Ali Khan discharged from Lilavati Hospital five days after knife attack
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2025
आरोपीला अटक
16 जानेवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. 60 तासांच्या मेहनतीनंतर मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा ३० वर्षांचा असून तो बांगलादेशचा रहिवासी आहे.
सध्या आरोपी 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत असून, यादरम्यान त्याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीने पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले असून सैफच्या घरावर हल्ला करण्यापूर्वी त्याने इतर अनेक स्टार्सच्या घरांची रेकी केल्याचे सांगितले आहे. सैफच्या इमारतीत प्रवेश करणे सोपे होते म्हणून तो अभिनेत्याच्या घरात घुसला. मात्र पकडले गेल्याने त्याने सुटका करून घेण्यासाठी थेट सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. Saif Ali Khan |