मुंबई- अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची सुंदर केमिस्ट्री असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलरफुल असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ललित प्रभाकर याने हा पोस्टर शेअर केला. ललितचा हा प्रवास विविध रंगांनी बहरलेला असणार आहे. कारण त्याला यात एक खास जोडीदारही मिळालेली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर ही जोडीदार आहे.
चित्रपटाचं पोस्टर पाहून हा चित्रपट रोमॅन्टिक जॉनरचा असल्याचं समजतंय मात्र अजून कोणत्याच कलाकाराने याबाबतची संपुर्ण माहिती दिली नाही आहे. आनंदी गोपाळ मधील गोपाळरावांची भूमिका ललितने सचोटीने पेलली होती. त्यानंतर या चित्रपटासाठी त्याला अवार्ड्सही मिळाले होते.
सई ताम्हणकर ही मराठी इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या पोस्टरवरुन ती याही चित्रपटात ग्लॅमरस प्रेमिकेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.