दबंग 3 मधुन पदार्पण करणारी महेश मांजरेकरची कन्या सई मांजरेकरचा 18 वा वढदिवस “दबंग 3’च्या कलाकार मंडळींसोबत नुकताच साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाच्या छोट्याशा पार्टीला सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, अरबाझ खान, लुलिया वंतुर, आयुष शर्मा, अलविरा खान अग्निहोत्री, अरबाझ खानचा मुलगा अरहान खान, सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान इत्यादी पब्लिकबरोबर सई मांजरेकरचे पालक महेश आणि मेधा मांजरेकरही उपस्थित होते.
बर्थडे गर्ल सई या निमित्ताने खूपच क्युट दिसत होती. सलमान आणि मांजरेकर कुटुंबीयांनी या बर्थडे गर्लसाठी ही खास पार्टी आयोजित केली होती. “दबंग 3’मध्ये सई आणि सलमानचे एक गाणेही असणार आहे. स्टार किड म्हणून तिला स्पेशल ट्रीटमेंट मिळेल, अशी तिची स्वतःचीही अपेक्षा नव्हती. पण सलमानबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांनाच ही स्पेशल ट्रीटमेंट आपोआपच मिळते.
त्यानुसार सईलाही ही ट्रीटमेंट मिळाली. तिला आता आपल्या पदार्पणाचा सिनेमा सुपरहिट होण्याची अपेक्षा आहे. “दबंग 3′ लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. तसे झाले तर सईसाठी ही पदार्पणातच हिट ठरेल.