सह्याद्रीच्या ट्रेकर्सनी बुजवले घाटातील खड्डे

सातारा – सह्याद्री ट्रेकर्स अँड ऍडव्हेंचर ग्रुप ऑफ महाबळेश्‍वर यांच्यावतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्रमसंस्काराचे धडे केळघर घाटात गिरवले. केळघर घाटातील रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतल्याने ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी हे खड्डे बुजविले.

महाबळेश्‍वर ते मेढा या केळघर घाटात रेंगडी ते केळघर-आंबेघर या गावापर्यंत डांबरी रस्त्याला लहान-मोठे असणारे खड्डे व साइडपट्ट्या खचल्या होत्या. कार्यकर्त्यांनी श्रमदानातून मुरम मातीने हे खड्डे आणि साइडपट्ट्या भरुन घेतल्या. शिवसेना महिलाध्यक्षा सौ. लीलाताई शिंदे, ट्रेकर्सचे अध्यक्ष संजय पारठे, सुनील जाधव, दीपक जाधव, किरण चव्हाण, वैभव जाणकर, गणेश बर्गे, अक्षय संकपाळ, गणेश कासुर्डे, विक्रम शेलार, प्रमोद पवार, धोडींराम शेलार, आकाश शेलार, वनिता कदम, स्मिता पारठे, सुमित पाटील आदींनी सहभाग घेतला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.