Sahyadri Express Robbery : कराड तालुक्यात सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिग्नलमध्ये छेडछाड करून रेल्वे थांबवण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांचे मोबाईल व दागिने लुटण्यात आले. (Sahyadri Express Robbery) मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री शेणोली स्टेशनजवळ आली असता सिग्नल अचानक बंद पडला. संशयितांनी मुद्दाम सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवली, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. रेल्वे थांबल्याचा फायदा घेत अज्ञात दरोडेखोरांनी डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवाशांचे मोबाईल आणि सोने लुटले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Sahyadri Express Robbery)