सह्याद्री प्रतिष्ठानला सदैव सहकार्य : घाडगे

पुसेसावळी – सह्याद्री प्रतिष्ठान सामाजिक कार्यात कायम तत्पर असून प्रतिष्ठानच्या विधायक कार्यासाठी कायम सहकार्य करू, असे मत पोलीस उपनिरीक्षक सागर घाडगे यांनी व्यक्त केले.

वडी, ता. खटाव येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. घाडगे म्हणाले, सह्याद्री प्रतिष्ठान हे गेल्या पाच वर्षांपासून सामाजिक सेवेत कार्यरत असून विविध समाजपयोगी उपक्रम राबवत आहे. वडी गावातील माजी विद्यार्थी, व्यावसायिक, ग्रामस्थांच्या मदतीने दरवर्षी विद्यार्थाना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते.

कार्यक्रमास मुंबई पोलीस इम्रान मुलाणी, सोमनाथ महाडिक, अमित काळे, विकास शेडगे, रघुनाथ करे, सरपंच अनिल सूर्यवंशी, देवदास यादव, गणेश येवले, किरण येवले, वडी हायस्कूलचे प्राचार्य अडसुळे सर, मुख्याध्यापक श्रीकांत भंडारे आणि सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अंगणवाडी, मराठी शाळा आणि हायस्कूलमधील एकूण 250 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मोहीते सर यांनी मानले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यातही दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्याख्यानमाला, विद्यार्थी दतक योजना व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक सह्याद्री प्रतिष्ठान वडीचे किरण येवले यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.