‘साहो’ चित्रपटाने केली चार दिवसात तब्ब्ल एवढी कमाई…

मुंबई- सध्या चित्रपटसृष्टीत ‘साहो’ची जोरदार चर्चा सुरू आहे. बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता ‘साहो’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरम्यान, ‘साहो’ने (हिंदी) प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने तब्ब्ल 93.28 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे लवकरच ‘साहो’ 100 कोटींच्या घरात जाणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

या कमाईसोबत ‘साहो’ने यावर्षी सर्वात मोठी ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ऍक्‍शन लव्हर्स प्रेक्षकांना साहो चित्रपट नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला आहे. त्यामुळे चित्रपटला  प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)