नाशिक – नामवंत दिग्दर्शक व लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. 50 हजार रुपये रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्रिसदस्यीय समितीने या पुरस्काराचे काम पाहिले होते.
हा पुरस्कार 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकाला प्रदान करण्यात येतो. हा बहुमान मिळाल्यामुळे प्राजक्त देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्त देशमुख यांच्यासोबत बंगाली भाषेतील लेखक श्याम बंदोपाध्याय यांनादेखील हा पुरस्कार मिळाला आहे. पुराणपुराष या पुस्तकासाठी बंदोपाध्याय यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.