कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार

कोल्हापूर – केंद्रीय साहित्य अकादमीचा अनुवादीत पुरस्कार सोनाली नवांगुळ यांच्या अनुवादीत `मध्यरात्री नंतरचे तास’ या कादंबरीला जाहीर आला आहे. सलमायांच्या मूळ तामिळ भाषेतील कादंबरीचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी अनुवादीत केलेल्या `मध्यरात्री नंतरचे तास’ या मराठी कादंबरीत तामिळनाडूमधील मदुराईजवळची एकदोन लहानशी गाव आहेत. कादर आणि करीम हे गावातील तालेवार भाऊ, त्यांच्या बायका ही पात्रे या कादंबरीच्या मुख्य नायक आहेत. बाकी त्यांचे शेजारी, अनेक नातेवाईक या मध्ये कादंबरी फिरत राहते. या कादंबरीला प्रेमकथेची झालरही आहे.

या कादंबरीत काही तमिळ शब्द जसेच्यातसे ठेवले आहेत. कोल्हापुरातील लेखिकेच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ही कोल्हापूरसह साहित्य क्षेत्रासाठी खूप मोठी गोष्ट आहेत. 50 हजार रूपये रोख रक्कम, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यापुर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतू साहित्य क्षेत्रातील सगळÎात महत्वाचा पुरस्कार सोनाली नवांगुळ यांना मिळाल्याने त्यांच्या लिखानाला योग्य न्याय मिळाल्याच्या भावना साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.