#SAG2019 : भारतीय महिला फुटबाॅल संघाचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय

पोखारा(नेपाल): भारतीय महिला फुटबाॅल संघाने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली शानदार कामगिरीत सातत्य राखत आज पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यावर एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाने गुरूवारी पोखरा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा ६-० ने पराभव करत दणदणीत विजय मिळविला.

भारतीय संघाने पहिल्या सत्रात ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुस-या सत्रात आणखी दोन गोल करत ६-० ने एकतर्फी विजय मिळवला. भारतीय संघाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. भारताने पहिल्या सामन्यात मालदीवचा ५-० ने पराभव केला होता.

भारतीय संघाकडून आजच्या सामन्यात संध्या रंगनाथन हिने १० व्या आणि २५ व्या मिनिटाला असे दोन गोल केले तर रतनबाला देवी हिने १८ व्या आणि ८८ व्या मिनिटाला दोन गोल केले. याव्यतिरिक्त डांगमेई ग्रेस हिने ७ व्या आणि बाला देवी हिने ९१ व्या मिनिटाला असे प्रत्येकी एक-एक गोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.