#SAG2019 : नऊ फलंदाज शून्यावर बाद; मालदीवचा संपूर्ण संघ ८ धावांत गारद

पोखरा : एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात संघातील नऊ फलंदाज शून्यावर बाद झाल्याचं एेकून आश्चर्य वाटेल, पण असाच अनुभव शनिवारी दक्षिण आशियाई स्पर्धेत मालदीव विरूध्द नेपाळ या महिला संघाच्या टी-२० लढतीत किक्रेटप्रेमींना आला. मालदीव महिला संघाचे ९ फलंदाज भोपळा न फोडताच तबूंत परतले.

सलामीवीर फलंदाज एमालाच १ धाव घेता आली आणि ती बाद झाली, तर अतिरिक्त ७ धावांमुळे मालदीव संघाला ११.३ षटकांत सर्वबाद एकूण ८ धावा काढता आल्या.

नेपाळकडून गोलंदाजीत अंजली चंदने ४ षटकात १ धाव देत ४ फलंदाज बाद केले. यानंतर नेपाळने विजय लक्ष्य १.१ षटकांत एकही विकेट न गमवता पूर्ण केले आणि हा सामना १० विकेट , ११३ चेंडू शिल्लक राखून जिंकला.

महिला टी-२० क्रिकेटमधील दुसरी नीचांकी धावसंख्या

आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमधील ही दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी जूनमध्ये रवांडा संघाविरूध्द माली संघाचा डाव अवघ्या ६ धावांत गारद झाला होता. त्यानंतर शनिवारी (७ डिसेंबर २०१९) नेपाळ संघाविरूध्द मालदीवचा संघाचा डाव अवघ्या ८ धावांत गारद झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.