पुणे – नागरिकांना सुरक्षिततेची शिकवण देण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून नेहमीच काहीतरी हटके संकल्पना अंगिकारली जाते. सोशल मीडियाद्वारे कधी फिल्मी डायलॉग, कविता, व्यंग असे नानाविध पर्याय राबविणात येतात. यंदा चक्क सुरक्षिततेचे व्याकरण शिकविले जात आहे. करोनाबाबत आवश्यक सुरक्षिततेचे उपाय हे व्याकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलिसांनी समजावून सांगितले.
नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल नेहमीच भीती असते. भीतीपोटी अनेकदा पोलीस आणि नागरिकांमध्ये न दिसणारी अशी भिंत निर्माण होऊन, या दोन्ही घटकांचा एकमेकांशी योग्यप्रकारे संवाद साधला जात नाही. ही भीती कमी करण्यासाठी आणि मनोरंजनाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत त्यांना सुरक्षिततेचे धडे देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत काही भन्नाट संकल्पना राबविल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून महराष्ट्र पोलिसांनी आपल्या “ट्विटर’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरक्षिततेच्या व्याकरणाचा धडा दिला आहे.
Once you make a habit out of wearing a mask, there is no looking back.#DistanceMatters pic.twitter.com/UFDR2Ow0AF
— PUNE POLICE (@PuneCityPolice) July 16, 2020