सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे प्रयत्न

पुणे – शालेय विद्यार्थी वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या वतीने शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 850 मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.

यामध्ये मुख्याध्यापकांना शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या सुरक्षेबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्याचबरोबर स्कूल बस वाहतुकीच्या नियमावलीबाबत प्रबोधन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस प्रशासन, आरएसपी आणि शिक्षण विभागाच्या वतीने कार्यशाळाचे आयोजन केले होते. दिवे येथे झालेल्या कार्यशाळेमध्ये 250, तर आळंदी रोड येथील कार्यशाळेत 600 मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सुमंत पाटील, चंद्रकांत माने, सचिन विधाते, गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे, आरएसपीच्या प्रतिभा हरिभक्त आदी उपस्थित होते. येत्या 31 जुलैपर्यंत विविध ठिकाणी या कार्यशाळांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि स्कूल बस सुरक्षितता समितीचे सदस्य सचिव संजीव भोर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.