सुरक्षित पाऊल

– हेमचंद्र फडके

निवडणुकांमध्ये मतदानयंत्रे पळवण्याच्या घटना पूर्वी मोठ्या प्रमाणावर होत होत्या; अलीकडील काळात हे प्रमाण कमी झालेले असले तरी असे प्रकार पूर्णतः थांबलेले नाहीत. गतवर्षी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुंकाच्या वेळी अशा काही घटना घडल्या होत्या. काही तक्रारींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी ही यंत्रे हॉटेल अथवा अन्य ठिकाणी नेली होती, असेही म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने यंदा एक शक्‍कल लढवली आहे. या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी व्हीव्हीपॅट असणाऱ्या मतदान यंत्रांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर जीपीएस बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रापासून कंट्रोल रुमपर्यंत या वाहनातून यंत्रे नेताना ती अन्यत्र कोठे जात नाहीत ना हे समजणे शक्‍य होणार आहे. ही व्यवस्था पोटनिवडणुकांमध्येही वापरण्यात येणार आहे. यावर देखरेखीचे काम मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. केवळ निर्धारित मार्गावरुनच ही वाहने जाताहेत की नाही हे पाहण्यात येणार नसूून त्यांसाठी लागणाऱ्या वेळेकडेही लक्ष देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी यंदा निवडणूक आयोगाने 10.35 लाख मतदान केंद्रे देशभरात बनवली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ही संख्या 9.28 लाख इतकी होती. यंदा जवळपास 39.6 लाख ईव्हीएम आणि 17.4 लाख व्हीव्हीपॅट मशिन्सचा वापर केला जाणार आहे. यामध्ये काही मतदान यंत्रे ही राखीव स्वरूपाची आहेत. एखाद्या मतदान यंत्रात बिघाड झाल्यास मतदान प्रक्रिया खंडित होऊ नये, मतदारांचा खोळंबा होऊ नये यासाठी तेथे लगेचच नवीन यंत्र बसवूून कार्यान्वित करणे आवश्‍यक असते. त्यासाठी ही राखीव यंत्रे कामी येतात.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×