साध्वी यांचे वक्तव्य निंदनीय – रामदास आठवले

करकरेंकडे त्यांच्याविरोधात होते पुरावे
नवी दिल्ली – मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेले वक्‍तव्य निंदनीय आहे, असे म्हणत एनडीएतील सहयोगी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वादात उडी घेतली आहे.

आठवले म्हणाले, एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे साध्वींच्या विरोधात पर्याप्त पुरावे होते. प्रज्ञा ठाकूर यांचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित आहे, असे म्हणत त्यांनी साध्वींच्या वक्तव्याचा निषेध केला.
आठवले म्हणाले, हेमंत करकरे लोकांचे जीव वाचवताना आणि दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. मी साध्वींच्या मताशी सहमत नाही. मी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. हा मुद्दा न्यायालयाचा आहे. न्यायालय काय चूक आणि काय बरोबर ते सांगेल, असेही आठवले म्हणाले.

भाजपने प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळ लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह भोपाळमधून मैदानात आहेत. या जागेसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, मला त्यांना किंवा त्यांच्या विधानांना महत्त्वही द्यावंसे वाटत नाही. मी फक्त हेमंत करकरे यांच्याबद्दलच बोलू इच्छिते. ते रोल मॉडेल होते आणि त्यांचे नाव अभिमानानेच घेतले पाहिजे, असे मत हेमंत करकरे यांच्या कन्या जुई करकरे-नवरे यांनी नुकतेच व्यक्त केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.