साध्वींची खासदारकीची शपथ देखील ठरली वादग्रस्त; वाचा नेमकं काय घडलं…

नवी दिल्ली – निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे माध्यमांच्या प्रकाश झोतात राहिलेल्या भाजपच्या भोपाळ येथील विद्यमान खासदार तथा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांची १७व्या लोकसभेतील खासदारकीची शपथ देखील वादग्रस्त ठरली आहे.

नवी दिल्ली येथे आजपासून १७व्या लोकसभेचे प्रथम अधिवेशन सुरु झाले असून आज नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या संविधानिक पदाची शपथ घेतली. यावेळी भोपाळ येथून काँग्रेसचे जेष्ठनेते दिग्विजय सिंह यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश मिळविलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या शपथविधी दरम्यान भलताच गोंधळ उडाला. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी शपथ घेत असताना आपल्या नावासोबत आपले गुरु पूर्ण चेतनानंद अवधेशानंद गिरी यांचे नाव जोडले. ही गोष्ट विरोधकांच्या लक्षात येताच त्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. यानंतर सभागृहाचे हंगामी सभापती वीरेंद्र कुमार यांनी साध्वी यांना आपल्या निवडणूक उमेदवारी अर्जावर भरलेल्या नावानेच शपथ घेण्याची सूचना दिली.

साध्वी यांनी आपली संपूर्ण शपथ संस्कृतमध्ये घेतली तसेच शपथ घेतल्यानंतर ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देखील दिली. साध्वी यांच्या शपथविधीनंतर भाजप खासदारांनी आपल्या प्रत्येक खासदाराच्या शपथविधीनंतर ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.