साध्वी प्रज्ञासिंह यांच्या अडचणीत वाढ; एनआयए कोर्टाचा दणका

मुंबई: भाजपच्या नवनिर्वाचित खासदार आणि मालेगाव बॉंम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी एनआयए कोर्टात प्रत्येक आठवड्यात हजेरी लावण्यापासून सूट मिळण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज कोर्टाने फेटाळला आहे.

साध्वी यांनी कोर्टात अर्ज सादर करताना ‘आपण खासदार झाल्यामुळे संसदेतील कामकाजात भाग घ्यायचा आहे’, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र कोर्टाने फक्त त्यांना गुरुवारी (२० जून) फक्त एका दिवसासाठी हजेरी लावण्यापासून सूट दिली आहे.

२००८ मालेगाव बॉंम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी ब्लास्ट विषयी आपल्याला माहित नसल्याचे सांगितले होते. कोर्टाने साध्वी अन्य आरोपीना आठवड्यातून एकदा करतात हजेरी लावण्यास सांगितले होते. यामध्ये कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा देखील समावेश आहे.

मालेगावमध्ये ८ सप्टेंबर, २००६ रोजी बडी रातच्या दिवशी मशिदीजवळ कब्रस्तानाबाहेर साखळी बॉम्ब स्फोट झाला. सायकल बॉम्बद्वारे घडविण्यात आलेल्या या बॉम्बस्फोटात 31 जणांचा मृत्यू, तर जवळपास ३१२ जण जखमी झाले होते.

However, the Special NIA Court in Mumbai has given Pragya Thakur an exemption for today from attending the court. https://t.co/AqQsdrx5RT

— ANI (@ANI) June 20, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.