साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उच्च न्यायालयाची नोटीस

लोकसभेवरील निवडीला आव्हान देणारी याचिका दाखल

जबलपूर – भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यावरून मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी साध्वींना नोटीस बजावली. त्यांच्याकडून चार आठवड्यांत उत्तर मागवण्यात आले आहे.

मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपी असणाऱ्या साध्वींनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक मध्यप्रदेशच्या भोपाळ मतदारसंघातून लढवली. त्यांनी तिथून विजय मिळवताना माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला. आता साध्वींच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान देणारी याचिका भोपाळमधील मतदार असणाऱ्या एका पत्रकाराने दाखल केली आहे. प्रचार मोहिमेवेळी साध्वींनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केला.

तसेच, जातीय भावना भडकावणारी वक्तव्ये केली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार दिग्विजय यांना लक्ष्य करत खोटी वक्तव्ये केली. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील विविध तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच, साध्वींची लोकसभेवरील निवड रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.