पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह चार जणांच्या फोटोवर फूली
नवी दिल्ली : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना एक संशयित धमकी पत्र मिळाल्याचे समोर आले आहे. उर्दू भाषेत असलेल्या या पत्राबरोबर एका चिठ्ठीत पावडर सारखा पदार्थ देखील पाठवला गेलेला आहे. एवढेच नाहीतर या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे फोटो असून त्यावर फुली मारण्यात आलेली आहे. हे पत्र उघडकीस आल्याने एकच खबळबड उडाली आहे.
Pragya Singh Thakur, Bhopal MP: The letter is written in Urdu and some other letters were also attached with it. I have received such letters earlier too and informed the Police about it, they never took any action. This is a big conspiracy by enemies of the nation. pic.twitter.com/QY56PkDMLG
— ANI (@ANI) January 13, 2020
या पत्रामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे देखील फोटो आहेत. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतले आहे. शिवाय, त्यातील संदिग्ध पावडरची तपासणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत (एफएसएल) देखील पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून घेतली असुन, पत्र पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
माझ्या जीवाला धोका आहे, या अगोदर देखील अशा प्रकारचे धमकी देणारे पत्र मला आले होते, तेव्हा देखील मी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र आजपर्यंत याबद्दल कोणतीच कारवाई झाली नसल्याचे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे. तसेच, पत्रात माझ्या फोटोसह पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत. ज्यांच्यावर फुली मारण्यात आलेली आहे. अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे. हा देशाच्या शत्रुंचा मोठा कट असल्याचेही साध्वी प्रज्ञा यांनी सांगितले आहे.