मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी लग्न केले आहे. त्यांच्या या लग्नानंतर तिला ट्रॉलर्सच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता व्हीएचपी नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा स्वरावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
स्वराने पती फहाद अहमदबरोबरचा एक फोटो ट्वीट केला होता. तो फोटो कव्वाली नाइटमधील होता. या फोटोमध्ये स्वरा व फहादने गडद हिरव्या रंगाचे ट्रॅडिशनल कपडे परिधान केले होते. स्वराने हा फोटो शेअर करत ‘हॅलो शौहर’ असे कॅप्शन दिले होते.
ANY GUESSES❓
FRIDGE OR SUITCASE https://t.co/Hk57OYBVQH
— Dr. Prachi Sadhvi (@Sadhvi_prachi) March 16, 2023
स्वराचे हेच ट्वीट रिट्वीट करत साध्वी प्राची यांनी ‘काही अंदाज? फ्रीज की सुटकेस’ असे ट्वीट केले होते. पण हे ट्वीट नेटकऱ्यांना फारसं रुचलेलं दिसत नाही. त्यांच्या या ट्वीटवर युजर्सनी साध्वी प्राची यांच्यावरचा निशाणा साधला आहे.
साध्वी प्राची यांच्या ट्विटवर युझर्सनी ‘तुमच्या अशा विचारांवर चिड येते’, ‘तुमचं दुकान अशा ट्रोलिंगमुळेच सुरू आहे’, असे म्हटले आहे. तसेच ‘तुम्ही पण काय विचारताय? द्वेष पसरवून तुम्ही इतकं तर नक्कीच कमावलं असेल की नविवाहित जोडप्याला सूटकेस आणि फ्रीज दोन्हीही गिफ्ट करू शकाल’, ‘नवविवाहित जोडप्याला पाहून तुम्ही इतकं जळताय? तुम्ही स्वतःला साध्वी म्हणता का?’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.