2020मध्ये “सडक-2′ ठरली सुपर फ्लॉप?

2020मध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने जास्त चित्रपट प्रदर्शित होउ शकले नाही. परंतु लॉकडाउन पूर्वी आणि लॉकडाउनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपट प्रदर्शित झाले. या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये “सडक-2′ हा सुपर फ्लॉप ठरला आहे. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

एका सर्व्हेक्षणात 42.8 टक्‍के दर्शकांनी दिग्दर्शक महेश भट्‌ट यांच्या “सडक-2′ चित्रपटाला 2020मधील सर्वात फ्लॉप ठरविला आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर नेपोझिटमचा वाद निर्माण झाल्याने त्याचा फटका “सडक-2′ चित्रपटाला बसला. या चित्रपटाच्या ट्रेलरला असंख्य चाहतयांनी डिस्लाइक करून विक्रम स्थापित केला होता. तसेच चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्‌ट आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. “सडक-2’नंतर “कुली नंबर1′ हा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. याला 21.4 टक्‍के प्रेक्षकांनी वोट केले आहे. यानंतर “स्ट्रीट डान्सर 3डी’, “लक्ष्मी’, “लव आज कल’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी नापसंती दर्शविली. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा “गुलाबो सिताबो’ला प्रेक्षकांनी नाकारले. या चित्रपटाचे कथानक अनेकांना कळाले देखिल नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.