“सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले” राष्ट्रवादीचा पलटवार

सातारा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात कृषी विधेयकाचे समर्थन केले आहे, आणि आता ते विरोध करत असल्याने त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र हे खोटे आहे असे जाहीर करावे, अशी खिल्ली रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी पवारांची उडवली होती.

…तर ‘ते’ आत्मचरित्र खोटे असल्याचे पवारांनी जाहीर करावे : सदाभाऊ खोत

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काही विदेशी सेलिब्रिटींनी ट्‌विट केले तर त्यावर काही खेळाडू आणि अभिनेत्यांनी विरोधी सूर आळवल्याने वादंग झाले. शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर तसेच अन्य काही सेलिब्रिटींना सल्ला दिला होता. पवारांच्या या सल्ल्याचीही खिल्ली खोत यांनी उडवली.  त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी प्रतिउत्तर दिल आहे.

नेमकं काय म्हणाले मेहबुब शेख

“कुस्ती काय असते हे शरद पवारांनी निवडणुकीत दाखवून दिलं आहे. तुमचा मुलगा जिल्हा परिषदेत पडला.  तुम्ही ज्या नर्सरीत शिकता, तिथले पवारसाहेब संस्थापक आहेत. या वयात त्यांनी कुस्ती खेळणं सदाभाऊंना अपेक्षित आहेत का? सदाभाऊ खोत हे कडकनाथ कोंबडीवाले आहेत, कोणाच्या बाबतीत काय बोलावं ते त्यांना समजत नाही. ते काहीही बोलू शकतात. ते पुढे म्हणाले,पवारांच्या कारकिर्दित क्रिकेटमध्ये २०-२० सामने सुरू झाले, वर्ल्ड कप सुरू झाले, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तर गाव पातळीवर खेळले आहेत.”

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.