मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय व्यक्तीही करोनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यातच आता माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले कि, माझी कोविड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः विलगीकरणात जात आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गणरायाच्या आणि आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत पुन्हा हजर होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
माझी कोवीड19,पाॅझिटीव आली आहे मी आता उतम आहे,व मी क्वॉरनटाईन,झालो आहे,तरी आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या,गणेशरायच्या व आपल्या सर्वाच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हाजर राहीन, धन्यवाद सदाभाऊ खोत
Posted by Sadabhau Khot on Tuesday, August 25, 2020
दरम्यान, मंगळवारी सदाभाऊ खोत शिराळा तालुक्यातील लोकार्पण कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. आरोग्य विभागास सदाभाऊ खोत यांनी स्थानिक विकास निधीतून फिरते कोविड अलगिकरण कक्ष स्थापन करणेसाठी दिलेल्या २० बेड व इतर वैद्यकीय साहित्याचा लोकार्पण केले.