दुःखद बातमी – राजस्थानात राम-कथेसाठी उभारलेला मंडप कोसळला; 14 ठार

बारमेर, (राजस्थान) – राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात काही वेळापूर्वी धार्मिक कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप कोसळला असून या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जण ठार तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानातील बारमेर जिल्ह्यात सदर ठिकाणी “राम कथा’आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सुरु असतानाच उपस्थितांची बैठक व्यवस्था करण्यासाठी उभारण्यात आलेला मंडप सोसाट्याच्या वाऱ्याने अचानक कोसळला. त्यामुळे त्याखाली बसलेले अनेकजण मंडपाखाली दबले गेले. सदर वृत्ताला अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक खिंव सिंह यांनी देखील दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेतील जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.